Advertisement

पाचोरा भडगाव : रोटरी क्लब पाचोरा भडगाव तर्फे बालकातील लसीकरण महत्व यावर मार्गदर्शन व दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत ऍप वाटप 

पाचोरा भडगाव : रोटरी क्लब पाचोरा भडगाव तर्फे बालकातील लसीकरण महत्व यावर मार्गदर्शन व दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत ऍप वाटप 

पाचोरा भडगाव : रोटरी क्लब पाचोरा भडगाव यांनी माध्यमिक विद्यालय पिंपळगाव ता भडगाव या शाळेत विद्यार्थ्यांना लसीकरण व महत्व यावर रो डॉ हेमंत पाटील अध्यक्ष भडगाव डॉक्टर्स असोसिएशन यांनी माहिती दिली. यावेळी कार्यक्रमासाठी रोटरी क्लब पाचोरा भडगाव अध्यक्ष डॉ मुकेश तेली, रोटरीचे पदाधिकारी व सदस्य चंद्रकांत लोढाया, भरत सिनकर, संजय कोतकर, चिंतामण पाटील, शैलेश तोतला, डॉ शांतीलाल तोतला, गावाचे माजी सरपंच पुरुषोत्तम तोतला,रो डॉ हेमंत पाटील,सु गी पाटील शाळेचे माजी मुख्याध्यापक शिव व्याख्याते सुनील पाटील, जोशी सर, शाळेचे मुख्याध्यापक पाटील सर, पर्यवेक्षक, शिक्षक शिक्षिका, इतर कर्मचारी व जवळपास शाळेतील 800 विद्यार्थी विद्यार्थिनी या कार्यक्रमासाठी हजर होते.यावेळी रोटरी क्लब अध्यक्ष डॉ मुकेश तेली यांनी रोटरीचे अनेक पोलियो निर्मूलन यासारखे अनेक सेवाभावी प्रकल्प यांचा आवर्जून उल्लेख केला. भविष्यात शाळेसाठी नवनवीन प्रोजेक्ट देण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवव्याख्याते सुनिल पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना रोटरी आणि सामाजिक भावना यांचे समन्वय यासोबत दाता व दातृत्वपणा यावर प्रकाश टाकला. यानंतर डॉ शांतीलाल तोतला व पुरुषोत्तम तोतला यांच्या दातृत्वाने शाळेतील दहावीच्या संपूर्ण विद्यार्थ्यांना रो शैलेश भाऊ तोतला यांच्या प्रयत्नाने आयडियल स्टडी ऍप मोफत देण्यात आले. रो संजय कोतकर यांनी ऍप बद्द्ल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अश्या या दातृत्वाबद्दल तोतला परिवाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!