पाचोरा : रोटरी क्लब पाचोरा भडगाव आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांचे संयुक्त विद्यमाने दि 09 सप्टेंबर 2025 रोजी जागतिक साक्षरता दिनानिमित्त ग्राहकांचे हक्क,अधिकार व ग्राहकांतील जगारूकता आणि साक्षरता* यावर मार्गदर्शन

रोटरी क्लब पाचोरा भडगाव आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांचे संयुक्त विद्यमाने दि 09 सप्टेंबर 2025 रोजी जागतिक साक्षरता दिनानिमित्त
माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोंडवाडा गल्ली पाचोरा (मिठाबाई कन्या विद्यालय) येथे
*ग्राहकांचे हक्क,अधिकार व ग्राहकांतील जगारूकता आणि साक्षरता* यावर मार्गदर्शन करण्यात आले.त्यावेळी शाळेला मानाचे असे रोटरी इंटरनॅशनल कडून प्राप्त इंटरेक्ट क्लब चे सर्टिफिकेशन देण्यात आले.यावेळी प्रमुख मार्गदर्शन डॉ अनिल दादा देशमुख जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक पंचायत, डॉ मुकेश तेली अध्यक्ष रोटरी क्लब पाचोरा भडगाव यांनी केले.
डॉ अनिल देशमुख यांनी ग्राहक, हक्क व अधिकार तसेच ऑनलाईन फसवणूक होऊ नये म्हणून घ्यायची काळजी व झाल्यानंतर तक्रार संबंधी संपूर्ण माहिती दिली.रोटरी अध्यक्ष मुकेश तेली यांनी रोटरीच्या महान कार्याचा आढावा घेतला.सदर कार्यक्रमासाठी रोटरी चे अध्यक्ष डॉ मुकेश तेली, सचिव डॉ.अजयसिंग परदेशी यासमवेत चंद्रकांत लोढाया, भरत सिनकर, संजय कोतकर, डॉ सिद्धांत तेली, अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुकाध्यक्ष संजय पाटील, सदस्य डॉ प्रशांत सांगडे तसेच अनेक रोटरी क्लब पाचोरा भडगाव चे सदस्य यासोबत शाळेचे जे ऐ पाटील सर, अनिल पवार सर, उज्वला महाजन मॅडम, अश्विनी पाटील मॅडम, मेश्राम मॅडम तसेच शाळेतील 350 विद्यार्थिनी भगिनी कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

















Leave a Reply