Advertisement

मिरजेतील ‘जनसुराज्य’ ची दही हंडी फोडली तासगावच्या शिवनेरी पथकाने

प्रतिनिधी सुधीर गोखले

काल रात्री मिरजेत रंगलेल्या जनसुराज्य शक्ती पक्ष आणि महायुती आयोजित दहीहंडी फोडण्याचा मान तासगावच्या शिवनेरी गोविंदा पथकाने पटकावला तब्ब्ल १,५५,९९९ रु  असलेली पश्चिम महाराष्ट्रातील भव्य दही हंडीचा थरार मिरज कर नागरिकांनी अनुभवला. सुरुवातीला बाळगोपाळांना छोटी दही हंडी समारादित्य समिती कदम यांच्या नेतृत्वाखाली फोडली त्यानंतर मोठ्या दहीहंडी ला सुरुवात झाली बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध अभिनेत्रींच्या मांदियाळीने या कार्यक्रमाची शोभा आणखी वाढवली. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन विशेष शुभेच्छा दिल्या तसेच हि दही हंडी  सिंदूर ला समर्पित केल्या मुळे विशेष अभिनंदनही केले. या दहीहंडी उत्सवासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आरोग्यमंत्री आणि कोल्हापूर चे पालकमंत्री प्रकाश आबिटकर तसेच जनसुराज्य शक्ती चे संस्थापक अध्यक्ष डॉ विनयजी कोरे, दलितमित्र आमदार डॉ अशोकराव माने, जिल्हाधिकारी अशोक काकडे, माजी खा संजयकाका पाटील खासदार विशाल पाटील माजी मंत्री आणि आमदार डॉ सुरेश खाडे, शिवसेना (शिंदे गट) नेते प्रा मोहन वनखंडे, भाजप नेत्या जयश्री पाटील, माजी सभापती महादेव कुरणे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब कदम, सौ हेमलता कदम, सौ विश्वगंधा कदम, अमित कदम, अमित कदम, डॉ पंकज म्हेत्रे, शिव भोसले  आनंद सागर पुजारी, आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. जनसुराज्य चे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी  या दहीहंडीचे संयोजन केले. जनसुराज्य चे मिरज शहर अध्यक्ष योगेश दरवंदर, सुनील बंडगर, विरंजन कद्दू मानतेश कुरणे यांनी दही हंडी यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले  या कार्यक्रमासाठी बॉलिवूड अभिनेत्री नेहा पेंडसे अमायरा दस्तूर, संस्कृती बालगुडे, अक्षया देवधर, जान्हवी किल्लेदार, प्रणाली सूर्यवंशी आदींनी या सोहळ्याची रंगत वाढवली                

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!