राज्य शासनाने महसूल वाढीसाठी राज्य उत्पादन शुल्क मध्ये केलेली लक्षणीय कर वाढ आता शासनावरच बुमरँग होण्याची चिन्हे आहेत. या करवाढी मुळे विदेशी मद्य विक्री मध्ये मोठा फरक पडला आहेच मात्र देशी दारू कडे मद्यपींची संख्या वाढत आहे. मात्र कर्नाटक महाराष्ट्र सीमेलगत बनावट मद्याची आयातही वाढली आहे सीमेलगत असणाऱ्या बार मध्ये किंवा वाईन शॉप मध्ये हुबळी मेड मद्य विक्री चे प्रमाण वाढले आहे. नवीन कर वाढी नंतर भारतीय बनावटीचे विदेशी मद्याची किंमत बार मध्ये एका बाटलीमागे ५० ते १०० रु इतक्या किमतीने वाढली आहे त्याचा थेट परिणाम ग्राहकांवर होत आहे परिणामी बऱ्याच बार मढील ग्राहकांची संख्या निम्म्याने घटली आहे. बार चालक आणि वाईन शॉप मधील मद्यविक्री हि ७० ते ८० टक्क्यांनी घातल्याचा दावा वाईन शॉप आणि बार चालकांनी केला आहे. *बनावट दारू विक्री जोमात*
सध्या या दरवाढीमुळे मद्य तस्कर पुन्हा सक्रिय झाल्याचे चित्र आहे विशेष करून कर्नाटक बनावटीची हुबळी मेड मद्य ५० ते ६० रुपयांना आणून ते सीमावर्ती भागात १०० ते १५० रुपयांना विकले जात आहे. यामुळे शासनाच्या महसुलावर परिणाम निश्चितपणे होणार आहे.
याबाबत राज्य उत्पादन शुल्क चे अधीक्षक प्रदीप पोटे यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संपर्क केला असता ते म्हणाले आमची भरारी पथके नेहमी अशा मद्य तस्करी वर लक्ष ठेऊन असतात मिरज विभागाचे निरीक्षक दीपक सुपे यांना याबाबत मी सूचना दिल्या आहेत अशी बनावट मद्य विक्री आढळून आल्यास आम्ही नक्की कारवाई करूच त्याचबरोबर नागरिकांनाही माझे आवाहन असेल कि कोठेही संशयास्पद मद्यविक्री किंवा मद्यसाठा आढळून आल्यास आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा”
राज्य शासनाने महसूल वाढीच्या नियोजनासाठी विदेशी मांड्यावर १० टक्के वॅट, १५ टक्के परवाना शुल्क, आणि ६० टक्क्यापर्यंत उत्पादन शुल्क वाढ केली आहे यामुळे शासनाच्या तिजोरीत तब्बल १४ हजार कोटींची भर अपेक्षित आहे मात्र बनावट मद्याची होणारी तस्करी वर आळा घालण्याचे या विभागाला एकप्रकारे आव्हान असेल.
Leave a Reply