जैन धर्मींयांचे पवित्र क्षेत्र असलेले श्री दिगंबर जैन सिद्धक्षेत्र कुंथलगिरी येथे ७८ वर्षीय आचार्य श्री १०८ वर्धमानसागरजी महाराज यांनी मागील २३ दिवसांपासून ‘यम सल्लेखना’ व्रत स्वीकारले असून आचार्यश्री यांच्या सर्वोच्च आणि कठोर समजल्या जाणाऱ्या या व्रताची माहिती मिळताच महाराष्ट्र कर्नाटक सीमाभाग तसेच राजस्थान आणि मध्यप्रदेशातील हजारो जैन धर्मीय श्रावक श्राविका कुंथलगिरी येथे त्यांच्या अंतिम दर्शनांसाठी दाखल होत आहेत. कुंथलगिरी येथे सिध्दक्षेत्रावर होणारी भाविकांची अभूतपूर्व गर्दी लक्षात घेऊन मंदिर समिती आणि प्रशासनाकडून चोख व्यवस्था करण्यात आली आहे. दूरवरून आलेल्या भाविकांना आचार्यश्री यांचे दर्शन सुलभतेने व्हावे यासाठी ठिकठिकाणी मोठे डिजिटल स्क्रीन लावण्यात आले आहेत. यावर लाईव्ह प्रक्षेपणाची सोया करण्यात आली आहे. कुंथलगिरी हे दिगंबर जैन समाजात पवित्र सिद्धक्षेत्र मानले जाते अत्यंत निर्मल प्रसन्न आणि शांत भावनेने देहत्याग करण्याची हि धार्मिक प्रक्रिया आचार्यश्रींच्या दृढ आत्मबलाचे दर्शन घडवते आचार्यश्री यांचे पूर्वाश्रमीचे (दीक्षा घेण्यापूर्वीचे) नाव पायगोंडा आदगोंडा पाटील असे होते ३ जानेवारी १९५१ साली त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील निमशिरगाव येथे झाला. . Website: http://satyarath.com/wp-admin
Leave a Reply