प्रतिनिधी सुधीर गोखले

वट पौर्णिमेला कॅलेंडरमधील ज्येष्ठ महिन्याच्या तीन दिवसांत (जे ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये मे-जूनमध्ये येते), एक विवाहित स्त्री तिच्या पतीवरील प्रेमाचे प्रतीक बन्याभोवती एक औपचारिक धागा बांधून दर्शवते. झाड. हा उत्सव महाभारतात सांगितल्याप्रमाणे सावित्री आणि सत्यवान यांच्या दंतकथेवर आधारित आहे.ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पासून पौर्णिमेपर्यंत हे त्रिरात्र व्रत करावे असे सांगितले आहे. तीन दिवस उपवास करणे अशक्य असेल त्यांनी फक्त पौर्णिमेलाच उपवास करावा. सावित्रीसह ब्रह्मदेव ही या व्रताची मुख्य देवता असून सत्यवान-सावित्री, नारद व यमधर्म या उपांग देवता आहेत. आज मिरजेतील पूर्व म्हाडा कॉलनी येथील सौ पद्मश्री कबाडे आणि त्यांच्या सहकारी मैत्रिणीनि येथील श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये वडाच्या झाडाला दोरा बांधून हे वटसावित्रीचे व्रत संपन्न केले यानिमित्त सौ पद्मश्री कबाडे म्हणाल्या आपल्या हिंदू धर्म संस्कृती नुसार आज आम्ही पारंपरिक पद्धतीने वट पौर्णिमेचा हा आपला सण साजरा करत आहोत. अगदी माझ्या सहकारी महिला आणि भगिनींनी वेळात वेळ काढून या सणानिमित्त आपापल्या पती देवांसाठी साकडे घातले आहे. त्या पुढे म्हणाल्या परंपरागत कथेनुसार सावित्रीने आंतरिक गुणांची पारख करून निवडलेल्या वरास आई-बाप आणि देवगुरू यांच्या विरोधाला डावलून माळ घातली, व पतीचे प्राण वाचवण्याचे अवघड काम चिकाटीने, दुर्दम्य इच्छाशक्तीने आणि चातुर्याने करून दाखविले.





Leave a Reply